Homeएनसर्कलअत्यंत कमी उंचीवरच्या...

अत्यंत कमी उंचीवरच्या गतीमान लक्ष्याला उडवणाऱ्या चाचण्या यशस्वी

डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल ओदिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सलग तीन उड्डाणचाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या. खूप  कमी उंचीवर उडणाऱ्या, अतिशय गतिमान लक्ष्यांवर या चाचण्या करण्यात आल्या.

तिन्ही उड्डाणचाचण्यांदरम्यान, संरक्षक क्षेपणास्त्रांनी वेगवेगळ्या उड्डाण परिस्थितीत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनप्रमाणे कमी ‘थर्मल सिग्नेचर’सह लक्ष्यांना रोखले आणि पूर्णपणे नष्ट केले. उड्डाणचाचण्या अंतिम तैनातीसाठी असलेल्या बाह्यस्वरूपामध्ये घेण्यात आल्या. यावेळी प्रत्यक्ष क्षेत्रावरील ऑपरेटर्सनी शस्त्रसज्जतेसह लक्ष्य हेरून क्षेपणास्त्रांचा मारा केला.

ही एक ‘मॅन पोर्टेबल’ हवाई संरक्षणप्रणाली आहे जी इमरत या संशोधन संस्थेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा आणि विकास सहउत्पादन भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि विकसित केली आहे. या क्षेपणास्त्रप्रणालीमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदल या सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे.

  • Explore tags ⟶
  • DRDO

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content