Homeब्लॅक अँड व्हाईट"धर्मवीर २"चा बॉक्सऑफिसवर...

“धर्मवीर २”चा बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक धमाका

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला. २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. १५००पेक्षाही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे.

धर्मवीर

चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद, श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मनात चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही, असे जाणकार सांगतात.

धर्मवीर

धर्मवीर २, या चित्रपटाची अजून एक विशेष बाब म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांची अगदी हुबेहूब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळत आहे. पडद्यावर मुख्यमंत्र्यांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ वन टेकमध्ये मुख्यमंत्र्यांचा तो सीन शूट झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content