Homeचिट चॅटकाजल, अनिल, मीनल,...

काजल, अनिल, मीनल, बाबुलाल राज्य कॅरम विजेते

मुंबईच्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या ५८व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या अनिल मुंढेने मुंबईच्या योगेश धोंगडेवर अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये २५-१७, २४-११ अशी मात करत विजेतेपद पटकाविले.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या फहिम काझीने मुंबई उपनगरच्या रिझवान शेखवर निसटता विजय मिळविला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईची काजल कुमारी विजेती ठरली. तिने ठाण्याच्या नवोदित मधुरा देवळेवर एकतर्फी  विजय मिळविला. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने सिंधुदूर्गच्या दीक्षा चव्हाणवर विजय मिळविला.

पुरुष वयस्कर गटातील अंतिम सामन्यात मुंबईच्या बाबुलाल श्रीमलने विजेतेपद पटकविताना मुंबई उपनगरच्या शब्बीर खानवर विजय प्राप्त केला. या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या सत्यनारायण दोंतुलने मुंबई उपनगरच्या गिरीधर भोजवर मात केली. महिला वयस्कर गटात अंतिम फेरीत ठाण्याच्या मीनल लेले-खरेने मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेला नमवले. तिसरा क्रमांक प्राप्त करताना कोल्हापूरच्या शोभा कामतने मुंबई उपनगरच्या जयमाला परबचा पराभव केला.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार तसेच सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष विजय सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, योगेश फणसळकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे खजिनदार संजय देसाई व सहसचिव संजय बर्वे उपस्थित होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content