Homeकल्चर +'देवमाणूस' किरण गायकवाड...

‘देवमाणूस’ किरण गायकवाड आता दिग्दर्शक..

“देवमाणूस”, “लागिरं झालं जी”, अशा गाजलेल्या मालिका तर “चौक”, “फकाट”, “डंका हरी नामचा” अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी “नाद”, “आंबट शौकीन” या आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शन किरण गायकवाड करत आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई येथे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अगरवाल यांनी ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अर्चना भुतडा सहनिर्मात्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे, अभिनेत्री अमृता धोंगडे या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका

आपल्याला पाहायला मिळणार आहेत. योगेश कोळी छायांकन, विजय गावंडे संगीत दिग्दर्शन, योगेश इंगळे कला दिग्दर्शक तर अजिंक्य फाळके कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे.

कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शन म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, याबाबत कुतूहल आहे. त्याशिवाय ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ या नावातून हे कथानक पोलिस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना थांबावं लागणार आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content