Homeएनसर्कल‘नोमॅडिक एलिफंट’चा कालपासून...

‘नोमॅडिक एलिफंट’चा कालपासून मेघालयात प्रारंभ

भारत मंगोलियाचा १६वा संयुक्त युद्धसराव ‘नोमॅडिक एलिफंट’चा काल मेघालयातील उमरोई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. हा युद्धसराव 16 जुलैपर्यंत चालेल. भारताच्या 45 जणांच्या पथकाचे प्रतिनिधित्व सिक्कीम स्काऊट्सची एका बटालियन तसेच अन्य शाखा आणि सेवा दलातील जवान करत आहेत. मंगोलियाच्या पथकाचे प्रतिनिधित्व मंगोलियन लष्कराच्या 150 क्विक रिअक्शन फोर्स बटालियनचे जवान करत आहेत.

‘नोमॅडीक एलिफंट’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग असून तो आलटूनपालटून मंगोलिया आणि भारतात आयोजित केला जातो. याआधीचा सराव मंगोलियात जुलै 2023मध्ये आयोजित केला गेला होता. ‘नोमॅडीक एलिफंट’ या युद्धसरावाच्या उदघाटनप्रसंगी मंगोलियाचे भारतातील राजदूत डाम्बजाविन गनबोल्ड व भारतीय सैन्यदलातर्फे 51 सबएरिया जीओसी मेजर जनरल प्रसन्न जोशी उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रसंघ मॅण्डेटअंतर्गत सातव्या प्रकरणातील सब कॉन्व्हेंशनल सिनॅरिओमधील घुसखोरीविरोधी मोहिमा चालवण्याच्यादृष्टीने दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हे या युद्धसरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावात निमशहरी व डोंगराळ भागातील मोहिमांवर भर दिला गेला आहे. या युद्धसरावात दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर, संयुक्त कमांड पोस्ट उभारणी, गुप्तसूचना व टेहळणी केंद्राची उभारणी, हेलिपॅड अथवा तत्सम धावपट्टीची सुरक्षा, छोट्या लढाऊ टीम्सना सीमापार पाठवणे आणि परत आणणे, विशेष हेलिकॉप्टर मोहिमा, वेढा व शोध मोहिमा,ड्रोनचा वापर तसेच शत्रूच्या ड्रोनला रोखणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे.

‘नोमॅडीक एलिफंट’ या युद्धसरावात दोन्ही देशांना संयुक्त मोहिमांमध्ये उपयोगी येणारी आपली युद्धकौशल्ये सामायिक करता येतील. या युद्धसरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये सहकार्य सुलभ होईल. बंधुभाव निर्माण होईल तसेच संबंधही सुधारतील. यामुळे या दोन्ही मित्रदेशांमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढीस लागेल व द्विपक्षीय संबंधातही अधिक सुधारणा होईल.

या युद्धसरावाच्या 16 जुलै 2024 रोजी होणाऱ्या समारोप समारंभात मंगोलियाचे सैन्यप्रमुख मेजर जनरल ग्यानब्याम्बा सुंरेव व भारतीय सैन्यदलाच्या 33 कोअर चे जीओसी लेफ्टनंट जनरल झुबीन ए मिनवाला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content