Homeन्यूज अँड व्ह्यूजअखेर कुर्ल्यात बुलडोझर...

अखेर कुर्ल्यात बुलडोझर चाललाच….!!

मुंबईत चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रस्त्यावर अखेर बुलडोझर चालला. थेट पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई महापालिकेलाही बुलडोझर चालवल्याखेरीज पर्याय राहिला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रोडवर अनेक छोटयामोठ्या ढाब्यांनी रस्ते अडवले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकात जाण्यास प्रवाशांना प्रचंड त्रास होत होता. धड रिक्षांनाही उभे राहण्यास तसेच प्रवाशांना उतरण्यास मोठा त्रास सहन करावा लागत होता. गेली 10/15 वर्षे प्रवासी तसेच कुर्ला / चेंबूरचे रहिवासी हा त्रास मुकाट्याने सहन करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील स्थानिक आमदार नवाब मलिक यांचा या ढाबेमालकांना छुपा पाठिंबा असल्याचेही बोलले जात होते.

मात्र काही दक्ष नागरिक या रोजच्या त्रासाला कंटाळले होते. त्यांनी यासंबंधात थेट पंतप्रधान कार्यालयाशी फोटोनिशी संपर्क साधताच सूत्रे खाडकन हलली. पंतप्रधान कार्यालयाने थेट महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तो सारा पत्रव्यवहार पाठवला. आता खुद्द पंतप्रधान कार्यालयातून आदेश आल्याने आयुक्तांनी कुणाशीही सपंर्क न साधता व आणखी कुणाचा आदेश न घेता पालिकेच्या कुर्ला व चेंबूर विभाग कार्यालयाला कामाला लावले व सोबत अतिक्रमणविरोधी विभागाचे पथक दिले. मग काय, काल दुपारपासून पाडकाम सुरु झाले व सुमारे 15/20 अनधिकृत ढाबे जमीनदोस्त झाले.

तसेच यांच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या टपऱ्याही उडवण्यात आल्या. या टपऱ्यांमध्ये अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचीही चर्चा आहे. जवळच असलेल्या रिक्षा थांब्यावरही दिवसाआड काहीतरी लोच्या व्हायचाच. यातूनच परड्या नामक रिक्षाचालक कम तथाकथित समाजकंटकाचा खून करण्यात आला होता. अजून त्या खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही. या खूनप्रकरणी खरा गुन्हेगार अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पकडण्यात आलेला संशयित हजर केलेला आरोपी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खरे गुन्हेगार चेंबूर व शेल कॉलनीच्या आसपास मिळतील. कारण त्या परिसरातूनच बटन गोळ्या / ड्रग्ज वितरित होतात, असा हवाला माहितगार सूत्रांनी दिला.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

वाजपेयीजी, कुठलेहो सत्य? समोर दिसते ते.. की काटकोनातले??

खरेतर पत्रकारितेत आल्यापासून साहित्यावर काही लिखाणच केलेले नाही. लोकसत्तेने काय ते 'लिट फेस्ट' आयोजित केली, तेथे प्रख्यात हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांना बोलावले व त्यांनी साहित्यात 'सत्याग्रह' असावा, असे नमूद केले, मग आम्हाला राहवलेच नाही. सांगण्यासारखे नाही. परंतु आम्हालाही...

प्रेमी युगुलाला मारहाण करणारी मुले गर्दुल्ली! प्रत्यक्ष भेटीतला कानोसा!!

दोन दिवसांपूर्वी मुंबईत कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात एका प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण करणारी सर्व मुले (चार-पाच) गर्दुल्ली व चरसी असून ही सर्व मुले घाटकोपरच्या नारायणवाडीत राहत असल्याची माहिती हाती आली आहे. वास्तविक हे उद्यान मॉलजवळ वगैरे असले...

तुम्हीच सांगा, दादर मोकळं झालं.. असं म्हणू तरी कसं?

मुंबईच्या दादर (प.) रेल्वेस्थानकाबाहेरील काही पदपथ महापालिका आणि पोलिसांनी काही प्रमाणात साफ केल्याचे कालच संध्याकाळी दिसून आले. पण काहीच पदपथ हे लक्षात घेतले पाहिजे. तेथे रात्री उशिरापर्यंत एक मोठी गाडीही उभी असते. पण त्याचा इच्छित परिणाम मात्र काहीच दिसून...
Skip to content