Homeडेली पल्सकॉलर उडवण्याआधी पाहवे...

कॉलर उडवण्याआधी पाहवे लागते सकाळ आहे की संध्याकाळ?

इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत. किरकोळ लोकांच्या समोरसुद्धा घाबरणार नाहीत. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक आहोत. छत्रपतींच काय बोलायचं? कॉलर उडवायची म्हणजे आधी सकाळ आहे का? संध्याकाळ आहे? हे बघावं लागतं. त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचे कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो. पण मत गादीला देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते. शशिकांत शिंदे कष्टकरी कुटुंबातले आहेत. आज त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तुमच्या पाठिंब्यावर ते यशस्वी होतील. हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात, मात्र भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कारवाई केली गेली. त्यांना धडा  शिकवण्याची ताकद सातारकरांमध्ये आहे, असे ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरात हल्ला झाला. अत्याचार केले गेले, त्यांच्या सासऱ्यांची हत्त्या करण्यात आली. यात ११ वर्षांची शिक्षा झाली. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालून सन्मान केला. स्त्रियांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाही. त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही.

देशातील शेतकरीवर्ग आज अस्वस्थ आहे. मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरायची असते. सध्या देशातील शेतकरी मोठा संकटात आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. १० वर्षांपूर्वी मी कृषी खाते सोडलं आणि मोदींचे राज्य आले. या दहा वर्षांत त्यांनी शेतीसाठी काय केलं? आज देशातील शेती संकटात आली आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देशभरातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किंमती नीट मिळाव्यात यासाठी आंदोलन करायचं ठरवलं. याठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने आले. यात केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांशी विचारविनिमय करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ढुंकून बघितलं नाही. पंजाबचा शेतकरी बहाद्दर होता. ही मंडळी संपूर्ण एक वर्ष याठिकाणी होती. शेवटी सरकारला नाईलाजाने हे धोरण मान्य करावे लागले. सरकारने शब्द दिला, निर्णय घेतले. पण त्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content