Homeएनसर्कल'वीरा'ने वाचवले नऊ...

‘वीरा’ने वाचवले नऊ मच्छिमारांचे प्राण

बोटीला आग लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नऊ मच्छिमारांना आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक जहाज “वीरा”ने तातडीने पाऊले उचलत नुकतेच वाचवले. 5 एप्रिल 2024 रोजी या बोटीला आग लागली होती. त्यानंतर या बोटीला जलसमाधी मिळाली होती.

आयसीजीएस वीराला विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे 65 आणि नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या भारतीय मासेमारी नौका (आयएफबी) दुर्गा भवानीला आग लागल्याचा जवळच्या मासेमारी बोटीकडून रेडिओ संदेश मिळाला होता. आयएफबी दुर्गा भवानी ही आंध्र नोंदणीकृत बोट 26 मार्च 2024 रोजी काकीनाडा बंदरातून नऊ कर्मचाऱ्यांसह निघाली होती. 5  एप्रिलला बोटीला आग लागल्याने जहाजावरील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सर्व नऊ मच्छिमारांनी जीव वाचण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतु काहींना गंभीर दुखापत झाली. स्फोटामुळे नुकसान झालेली मासेमारी बोट काही मिनिटांतच त्या ठिकाणी बुडाली. आग आणि स्फोटाची माहिती जवळच्या बोटीद्वारे तटरक्षक दलाच्या जहाजाला देण्यात आली.

परिस्थितीची निकड ओळखून आयसीजीएस वीरा वेगाने पुढे निघाले आणि वाचलेल्यांना मदत देण्यासाठी काही तासांतच त्या ठिकाणी पोहोचले. सर्व नऊ जणांना तटरक्षक दलाच्या जहाजात हलवण्यात आले तिथे वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. दरम्यान, तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्रमांक 6ने जेडी फिशरीज विशाखापट्टणम यांच्या समन्वयाने आयएफबीच्या गंभीर जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिकांची तातडीने व्यवस्था केली. सर्व जखमी मच्छिमारांना पुढील उपचारांसाठी विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले.

आयसीजी जहाजाने दिलेल्या जलद प्रतिसादामुळे संपूर्ण बचाव मोहीम सहा तासांच्या अल्प कालावधीत पूर्ण झाली. भारतीय तटरक्षक दल ही समुद्रातील मच्छिमारांना मदत पुरवणारी प्रमुख संस्था आहे तसेच समुद्रात शोध आणि बचाव कार्यासाठीची राष्ट्रीय समन्वय संस्था आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content