Homeएनसर्कलसुदर्शन पटनायक यांचे...

सुदर्शन पटनायक यांचे ‘मेरा पहला वोट देश के लिये’.. 

‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेला देशभरात गती देण्याच्या प्रयत्नात ख्यातनाम वालुकाशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओरिसात जगन्नाथ पुरीच्या सागर किनाऱ्यावर वालुकाशिल्प साकारले आहे. या शिल्पातून त्यांनी युवकांना तसेच मतदानात पहिल्यांदाच भाग घेत असणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीला मजबूत आणि समृद्ध करण्याचा संदेश दिला आहे.

पटनायक यांच्या कलेची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे वाळूवर साकारलेलं  शिल्प नसून प्रत्येक भारतीयाच्या मनावर उमटलेला ठसा आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात मंत्रिमहोद म्हणतात की #MeraPehlaVoteDeshKeliye, मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदाराच्या मनामध्ये या लोकशाही प्रक्रियेचा भाग होण्याची अनोखी उत्सुकता जागी करत आहे. या भावनेची उत्कृष्ट उभारणी या वाळूवर झालेली आपण बघत आहोत.

‘मेरा पहला वोट देश के लिए’ ही मोहीम देशातील वेगवेगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबवली जात आहे. तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे आणि देशाच्या भल्यासाठी मतदान करण्याचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेमुळे निवडणुकीचे महत्त्व आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मतदान करण्याचा अभिमान या गोष्टी ठळक होत आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content