Homeन्यूज अँड व्ह्यूजमकरान किनाऱ्यावरून 3089...

मकरान किनाऱ्यावरून 3089 किलो चरस नेणारी नौका जप्त!

भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो प्रतिबंधित (3089 किलोग्रॅम चरस, 158 किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि 25 किलो ग्रॅम मॉर्फिन) अंमली पदार्थ वाहून नेणारी एक संशयित नौका नुकतीच ताब्यात घेतली आहे.

याबाबत भारतीय नौदलाच्या सागरी टेहळणी विमानांकडून गुप्त माहिती मिळाली होती. तसेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने या गुप्त माहितीची शहानिशा केली होती. या माहितीच्या आधारावर, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अंमली पदार्थांसह भारतीय जल सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयास्पद नौकेला अडवण्यासाठी भारतीय नौदलाने आखलेल्या मोहिमेत एका युद्धनौकेद्वारे कारवाई केली. या नौकेला रोखून अलिकडच्या काळात अंमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर, ताब्यात घेण्यात आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जवळच्या भारतीय बंदरात खेचून नेले आणि त्यावरील कर्मचारी तसेच प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा कायदे अंमलबजावणी संस्थेच्या हवाली केला.

ही कारवाई केवळ जप्त केलेल्या अवैध मालाचे प्रमाण आणि मूल्य या दृष्टीनेच महत्वपूर्ण आहेच शिवाय मकरान किनाऱ्यावरून निघणाऱ्या आणि विविध दिशांना तसेच हिंद महासागर क्षेत्रातील देशांना जाणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचे मार्ग ध्वस्त करण्यासाठी भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्रयत्नांना अधोरेखित करते. ही यशस्वी समन्वित मोहीम, विशेषत्वाने भारताच्या सागरी सीमा क्षेत्र परिसराचा बेकायदेशीर कृत्यांसाठी वापर करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय नौदलाची मजबूत वचनबद्धता आणि संकल्प दर्शविते.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content