Homeएनसर्कलमाहिती तंत्रज्ञानातल्या सहकार्यावर...

माहिती तंत्रज्ञानातल्या सहकार्यावर भारत आणि ओमानमध्ये सामंजस्य करार

भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ओमानचे परिवहन, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 15 डिसेंबर 2023 रोजी स्वाक्षरी झालेल्या या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर सहाय्य, तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण आणि गुंतवणूक याद्वारे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक सहकार्याला प्रोत्साहन देणे, हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. सामंजस्य करार दोन्ही देशांच्या स्वाक्षरीच्या तारखेपासून, 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात G2G आणि B2B असे दोन्ही प्रकारचे द्विपक्षीय सहकार्य वाढेल. सामंजस्य कराराद्वारे दोन्ही देशांमधील सहकार्य वाढण्याची अपेक्षा असून, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पार्श्वभूमी:

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सहकार्याच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक चौकटी अंतर्गत माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या (आयसीटी) उदयोन्मुख आणि आघाडीच्या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याचे निश्चित केले आहे. आयसीटी क्षेत्रात द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय अनेक देश आणि बहुपक्षीय संस्थांबरोबर सहयोग करत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयसीटी क्षेत्रात सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यासाठी विविध देशांमधील त्याच्या समकक्ष संघटना/संस्थांबरोबर  सामंजस्य करार/करार केले आहेत. देशाला डिजिटली सक्षम समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तित करण्यासाठी, भारत सरकारने हाती घेतलेल्या, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, ई. यासारख्या विविध उपक्रमांशी हे सुसंगत आहे. या बदलत्या परिप्रेक्षात, परस्पर सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने व्यवसायाच्या संधी शोधणे, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, ही काळाची गरज आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content