Homeबॅक पेजलाकडाच्या वाहतुकीसाठी आता...

लाकडाच्या वाहतुकीसाठी आता ‘एक राष्ट्र-एक पास’!

देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वनोपजांची विनाअडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय मालवाहतूक परवाना प्रणालीचा (एनटीपीएस) प्रारंभ केला.

सध्या, राज्यांच्या विशेष मालवाहतूक नियमांच्या आधारे लाकूड आणि वन उत्पादनांच्या वाहतुकीसाठी मालवाहतूक परवाने दिले जातात. “एक राष्ट्र-एक पास” व्यवस्था अशी एनटीपीएसची संकल्पना आहे. त्यामुळे देशभरात विनाअडथळा मालवाहतूक शक्य होईल. व्यवसाय सुलभतेसाठी हा उपक्रम देशभरातील कृषी वनीकरणामध्ये सहभागी असलेल्या वृक्ष उत्पादकांना आणि शेतकऱ्यांसाठी एकात्मिक ऑनलाईन पद्धत  वापरून लाकूड मालवाहतूक परवानग्या जारी करणे सुलभ करेल.

राष्ट्र

यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एनटीपीएस वापरण्याची व्यवहार्यता आणि सुलभता दाखवण्यासाठी, वनोपजांची वाहतूक करणाऱ्या देशभरातील भारतीय वाहनांना भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरमधून पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसाठी लाकूड आणि इतर वनोपज घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

एनटीपीएसच्या देशव्यापी अंमलबजावणीसह ही ऐतिहासिक कामगिरी आहे, असे भूपेंद्र यादव यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यांनतर सांगितले. एनटीपीएसमुळे भारताच्या विकासाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची हमी दिलेल्या अधिक पारदर्शकतेच्या दिशेने प्रवास बळकट करण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.

एनटीपीएस हे कृषी वनीकरण आणि जंगलाबाहेरील झाडांसाठी परिवर्तनकारी ठरेल यावर, पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी भर दिला.

वापरकर्त्यांच्या सोयीच्या दृष्टीने  एनटीपीएसची रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुलभ नोंदणी आणि परवाना अर्जांसाठी डेस्कटॉप आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स आहेत. एनटीपीएससाठी  https://ntps.nic.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content