Homeबॅक पेजएलटीटी रेल्वेस्थानकातही आता...

एलटीटी रेल्वेस्थानकातही आता ‘बोगी वोगी’!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पहिले आणि मुंबईतील दुसऱ्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ चे उद्घाटन हल्दीरामच्या सहकार्याने केले. या उद्घाटनप्रसंगी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच हल्दीरामचे संचालक नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले आहे. ज्याला बोगी वोगी, असे नाव देण्यात आले आहे.

या रेस्टॉरंटमध्ये ४० जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो. सीएसएमटीवरील रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू झाल्यापासून आजतागायत हजारो प्रवाशांनी यामधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेस्टोरंट ऑन व्हील्स सुरू झाले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची उत्तमरीत्या रंगरंगोटी केली गेली आहे. तसेच खाद्यपदार्थाच्या किमती कंत्राटदाराने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निश्चित केल्या आहेत. १० टेबलसह ४० जणांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येणार आहे. यापूर्वी हल्दीरामने नागपूर येथे रेस्टॉरंट ऑन व्हील्स ही संकल्पना सुरू केली होती. आता त्याचा विस्तार करण्यात आला असून एलटीटी येथे मुंबईतील दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. येथे ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातूनसुद्धा मध्य रेल्वेचे प्रवाशी खाद्य पदार्थ ऑर्डर करू शकतात. ही सेवा प्रवाशांसाठी रात्रभर उपलब्ध राहणार आहे.

यावेळी हल्दीरामचे संचालक नीरज अग्रवाल यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दलचा उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले की, हल्दीराम्समध्ये, आम्ही विशिष्ट आणि अविस्मरणीय जेवण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. रेल्वे-थीम असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आपण स्वादिष्ट अन्नाचा आस्वाद घेऊ शकतो तसेच या ठिकाणी आम्ही प्रवाशांना २४ तास दिवसरात्र अविरत सेवा देणार आहोत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content