Homeकल्चर +मुंबईत उद्यापासून रंगणार...

मुंबईत उद्यापासून रंगणार ‘पार्ले महोत्सव’!

मागील अनेक वर्षांपासून आयोजित होत असलेला मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’. हा महोत्सव उद्या, २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या २३व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा व खासदार पूनम महाजन विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख आयोजक व विलेपार्ल्याचे आमदार पराग अळवणी यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पार्ले महोत्सवाचे स्वरूप हे विविध स्पर्धांचे आयोजन असे असून, एकूण ३२ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील. यातील विविध वयोगट धरून सुमारे ३९२ प्रथम पारितोषिकांसह एकूण २५०० पारितोषिकं बहाल करण्यात येतील. २३ ते ३० डिसेंबर रोजी चालणारा हा महोत्सव विलेपार्लेमधील वामन मंगेश दुभाषी मैदान, पार्ले टिळक विद्यालय व साठ्ये महाविद्यालय तसेच सहार गाव मैदान अशा विविध ठिकाणी संपन्न होईल.

सातत्याने २३ वर्षं आयोजित होत असलेल्या पार्ले महोत्सवातील ३२ प्रकारच्या स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक भाग घेणार आहेत. या महोस्तवास यशस्वी करण्यासाठी ८००पेक्षा अधिक कार्यकर्ते आहेत. प्रेक्षकांसाठी भव्य स्टेडियम उभारलेल्या वामन मंगेश दुभाषी मैदानास कबड्डी क्षेत्रातील जाणते कार्यकर्ते कै. शंकर मोडक क्रीडा नगरी, कला विभागातील स्पर्धा होत असलेल्या साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्यस्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री चित्रमाऊली कै. सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात येणार आहे.

सातत्याने यशस्वीपणे होत असलेल्या या पार्ले महोत्सवाच्या आयोजन समितीच्या कोअर कमिटीमध्ये मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश महेता, अशी मंडळी असून माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता व माजी नगरसेवक अनिष मकवानी व अभिजीत सामंत यांचाही सहभाग आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content