Homeबॅक पेजगेल्या 9 महिन्यांत...

गेल्या 9 महिन्यांत अंतराळ स्टार्टअप्समध्ये 1000 कोटींची गुंतवणूक!

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांत भारतात अंतराळ स्टार्टअपमध्ये 1,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील झी टीव्ही नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये एका विशेष मुलाखतीदरम्यान डॉ. सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयानंतर, भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून उद्योग तसेच खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ही गुंतवणूक शक्य झाली आहे.

चार वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्रात फक्त एका स्टार्टअपपासून ते हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे जवळपास 190 खाजगी अंतराळ स्टार्टअप्स आहेत आणि पूर्वीचे काही स्टार्टअप्स मालक आता उद्योजक बनले आहेत, असे ते म्हणाले.

2014 मध्ये फक्त 350 स्टार्टअप्स होते, मात्र आज आपल्या देशात युनिकॉर्न्स व्यतिरिक्त सुमारे 1,30,000 स्टार्टअप्स आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबाह्य नियम रद्द केले आणि तंत्रज्ञानाच्या अनुकूल वापराद्वारे नागरिक केंद्रित प्रशासनावर लक्ष केंद्रित केले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीहरिकोटाचे दरवाजे सर्व संबंधितांसाठी खुले करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

इतकेच नाही तर तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करण्याकडे सरकारचा कल आहे आणि ते सर्व अडथळे किंवा अडथळे आणणारे नियम, जे फारसे सक्षम नव्हते, ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

जग भविष्यात एकात्मिक तंत्रज्ञानावर आधारित वाढ अनुभवणार आहे. भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेत आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content