Homeब्लॅक अँड व्हाईटपंतप्रधान मोदी करणार...

पंतप्रधान मोदी करणार आज कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परिषदेचं उद्‌घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.

जीपीएआय हा 29 सदस्य देशांचा बहुपक्षीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात वापर यातील तफावत भरून काढणे आणि एआयशी संबंधित प्राधान्ये तसेच, संशोधनाला पाठिंबा देणे, असा आहे. 2024 साली भारताकडे जीपीएआयचे अध्यक्षपद आहे. 2020 साली स्थापन झालेल्या जीपीएआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जीपीएआयचे समर्थक अध्यक्ष आणि 2024 मध्ये जीपीएआयचे प्रमुख अध्यक्ष म्हणून भारत 12 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत वार्षिक जीपीएआय शिखर परिषदेचे आयोजन करत आहे.

या शिखर परिषदेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा प्रशासन आणि एम. एल. कार्यशाळा यासारख्या विविध विषयांवर अनेक सत्रे आयोजित केली जातील. शिखर परिषदेतील इतर आकर्षणांमध्ये संशोधन परिसंवाद, एआय गेमचेंजर्स पुरस्कार आणि इंडिया एआय प्रदर्शन यांचा समावेश आहे.

या शिखर परिषदेत देशभरातील 50 हून अधिक जीपीएआय तज्ञ आणि 150हून अधिक वक्त्यांचा सहभाग असेल. याव्यतिरिक्त, इंटेल, रिलायन्स जिओ, गुगल, मेटा, एडब्ल्यूएस, योट्टा, नेटवेब, पेटीएम, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड, एनआयसी, एसटीपीआय, इमर्स, जिओ हॅप्टिक, भाषिणी यासह विविध कार्यक्रमांमध्ये जगभरातील आघाडीचे एआय गेमचेंजर्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञ सहभागी होतील. याव्यतिरिक्त, युवा एआय उपक्रम आणि स्टार्ट-अप्स अंतर्गत विजेते असलेले विद्यार्थी त्यांचे एआय मॉडेल आणि त्यांच्या मदतीने समस्यांवरील उपाय या प्रदर्शनात मांडले जातील.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content