Homeकल्चर +आजही अजरामर आहेत...

आजही अजरामर आहेत पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या!

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांचा  पहिला स्मृतीदिन आहे.

‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा…’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना…’ यासारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. गेल्या वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. सुलोचना चव्हाण यांनी मराठीव्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझलगायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती.

सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. या लावणीचे संगीतकार वसंत देसाई होते, तर ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. सुलोचना यांनी स्वरबद्ध केलेल्या पहिल्या लावणीचे बोल “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…” असे होते. आचार्य अत्रे यांनीच सुलोचना चव्हाण यांना “लावणीसम्राज्ञी” हा किताब दिला होता. आजही आपल्या सर्वांच्या मनांमध्ये सुलोचनाबाई चव्हाण या अजरामर आहेत, अशा भावना त्यांची नात आरती चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content