Homeकल्चर +आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा...

आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा..’ बुधवारी!

सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा..’ येत्या बुधवारी, ६ डिसेंबरला सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरला आणि अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ तसेच सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या गाण्यांना ज्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याच पद्धतीने या गाण्यालाही अपेक्षेहून जबरदस्त प्रतिसाद पहायला मिळणार असल्याचे रसिकांच्या प्रतिसादावरून जाणवू लागले आहे. हा चित्रपट १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर आणि गाणी जोरदार धुमाकूळ घालत आहेत.

‘छापा काटा’ चित्रपट ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत करत असून  चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. आपल्या लोकप्रिय पहाडी आवाजाच्या शैलीत आदर्श शिंदे यांनी या गाण्याचे गायन केले आहे. संगीत दिग्दर्शन गौरव चाटी यांनी केले असून शब्द शिवम बारपांडे यांनी दिले आहेत.

उत्तम कलाकारांची उत्तम कलाकृती रसिकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचवताना आम्हाला नेहमीच आनंद होतो. मात्र यावेळी मिळणाऱ्या प्रतिसादाचा आनंद अद्वितीय आहे. गाण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण चित्रपटही तेव्हढाच आवडेल अशी अपेक्षा आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

ट्रेलर  पाहण्यासाठी– 

https://drive.google.com/file/d/1X2dH2xNM1zvoBY_8De3eHjR2WeC_6Jxq/view?usp=sharing

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content