Homeडेली पल्सपंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या...

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची सध्याची फेरी 31 ऑक्टोबरपर्यंत!

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे सादर करणारा एक ई-लिलाव कार्यक्रम आयोजित केला आहे. या ई-लिलावामध्ये आमच्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन करणाऱ्या कलाकृतींचा अनोखा संग्रह आहे. हा ई-लिलाव 02 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत https://pmmementos.gov.in/ वर आयोजित करण्यात आला आहे.

केंद्रीय सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री  मीनाक्षी लेखी यांनी या ई-लिलावाबाबत माहिती देताना सांगितले की, दुर्गापूजा आणि दसरा सणांमुळे या ई-लिलावाला मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. ही यशस्वी लिलावांच्या मालिकेतील 5वी फेरी आहे, ज्याची पहिली फेरी जानेवारी 2019मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या म्हणाल्या की, मागील 4 आवृत्त्यांमध्ये 7000हून अधिक वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या आणि यावेळी ई-लिलावासाठी 912 वस्तू आहेत.

भेटवस्तू

त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारचा हा मोठा उपक्रम आपली राष्ट्रीय नदी, गंगा यांचे संवर्धन,  पुनर्संचयन करण्यासाठी आणि तिच्या संवेदनशील परिसंस्थेला चालना देण्यासाठी समर्पित आहे. या लिलावाद्वारे जमा होणारा निधी या उदात्त कार्यासाठी योगदान देण्यासाठी वापरला जाईल आणि या अमूल्य राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आमची अटल वचनबद्धता मजबूत करेल.

मीनाक्षी लेखी यांनी पंतप्रधाना मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्या चालू ई-लिलावाबद्दल पत्रकार परिषद घेतली, या लीलावांच्या मालिकेची ही 5वी यशस्वी फेरी आहे. त्यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपणाऱ्या ई-लिलावाबद्दल माहिती दिली आणि या लिलावाने कशाप्रकारे लोकांमध्ये स्वारस्य निर्माण केले ते अधोरेखित केले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content