Homeन्यूज अँड व्ह्यूजभारत आणि सौदी...

भारत आणि सौदी अरेबिया करणार ऊर्जा क्षेत्रात सहकार्य! 

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानच्या या करारावर नवी दिल्लीत 10 सप्टेंबर 2023 रोजी नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर के सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल्ला अझिज बिन सलमान बिन अब्दुल्ला अझिज अल सौद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारानुसार, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात खालील बाबींवर सहकार्य होणार आहे:

  1. अक्षय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, हायड्रोजन, वीज आणि दोन देशांमधील ग्रीड जोडणी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, धोरणात्मक पेट्रोलियम साठे आणि ऊर्जा सुरक्षा.
  2. अक्षय ऊर्जा, वीज, हायड्रोजन आणि आणि तेल आणि वायू साठवण क्षेत्रात द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
  3. चक्राकार अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी त्याचे तंत्रज्ञान, जसे की: कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवण.
  4. ऊर्जा क्षेत्रात डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सायबर-सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे.
  5. उर्जेशी संबंधित सर्व क्षेत्रे, पुरवठा साखळ्या आणि त्यांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित साहित्य, उत्पादने आणि सेवांना स्थानिक वापर करण्यासाठी दोन्ही देशांमधील गुणात्मक भागीदारी विकसित करण्यावर काम करणे.
  6. ऊर्जा क्षेत्रात  प्राविण्य असलेल्या कंपन्यांशी सहकार्य अधिक दृढ करणे.
  7. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर कुठल्याही क्षेत्रांबद्दल सहकार्य करण्यास दोन्ही देशांची सहमति असल्यास.

या सामंजस्य करारामुळे, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात एक मजबूत भागीदारी विकसित होईल. हा सामंजस्य करार भारताच्या ऊर्जा संक्रमणाला  तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील परिवर्तनाला पाठबळ मिळू शकेल.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content