Homeहेल्थ इज वेल्थदेशातल्या 30 ईएसआयसी...

देशातल्या 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सुरू!

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीतील ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) मुख्यालयात आयोजित महामंडळाच्या 191व्या बैठकीत देशभरातील 30  ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ केला.

या सेवेचा प्रारंभ हे देशाच्या अमृत काळात आपल्या श्रमयोगींच्या सर्वांगीण कल्याणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल असल्याचे यादव याप्रसंगी म्हणाले. ईएसआयसी रुग्णालयांतर्गत केमोथेरपी सेवा सुरू झाल्यामुळे, विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावरील अवलंबित कुटुंबीयांना कर्करोगावर अधिक चांगले उपचार सुलभ होतील.

केंद्रीय मंत्र्यांनी ईएसआयसीच्या डॅशबोर्डसह नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन केले. ईएसआयसी रुग्णालयांमधील संसाधने आणि खाटा, चालू बांधकाम प्रकल्पांची सद्यस्थिती इत्यादींवर अधिक चांगली देखरेख डॅशबोर्डमुळे सुनिश्चित होईल.  ईएसआयसी रुग्णालयांमध्ये कुशल वैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कार्य पुढे नेण्याचा निर्णय ईएसआयसीने घेतला आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.

आवश्यकतांचे  आकलन केल्यानंतर नवीन ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये स्थापन केली जातील. आतापर्यंत, 8 वैद्यकीय महाविद्यालये, 2 दंत महाविद्यालये, 2 नर्सिंग कॉलेज आणि एक पॅरा-मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात आली असून ती ईएसआयसीकडून चालवली जात आहेत, असे यादव यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content