Homeबॅक पेजराज्यातील ५ हजार...

राज्यातील ५ हजार गावांतील मातीचा होणार अभ्यास!

भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर यांच्या अखत्यारित असणाऱ्या नागपूरच्या अमरावती रोड स्थित नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग एनबीएसएसएलयुपी या संस्थेद्वारे महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाच्या अंतर्गत 17 जिल्ह्यातील 5,000 गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल मृदा संशोधन केले जात असून त्याप्रमाणे पीक लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गतदेखील झारखंड, बिहार, अंदमान सह अनेक राज्यांना कृषी विषयक मार्गदर्शक दिले जात आहे.

संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून ‘भूमी’ या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे रासायनिक त्याचप्रमाणे भौतिक परीक्षण देखील पाहणे शक्य होणार असल्याची माहिती एनबीएसएसएलयुपीचे संचालक डॉ. नितीन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी दूरसंवेदन उपयोजन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. जी. पी. ओवीरेड्डी मृदा संसाधन अभ्यास केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रमोद तिवारी, डॉ. उमाकांत मोर्या, भूमी नियोजन विभागाचे वैज्ञानिक डॉ. एच बिस्वास प्रामुख्याने उपस्थित होते. 

एनबीएसएसएलयुपी या संस्थेचा 47 वा स्थापना दिवस 1 सप्टेंबर रोजी साजरा होणार असून याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एस के चौधरी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ माफ्सूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील आणि गडचिरोली पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

एनबीएसएसएलयुपी ही संस्था गेल्या 46 वर्षापासून भारतातील भूसंपत्तीची माहिती संकलित करून असून त्याचे दस्तऐवजीकरण करत आहे. या संस्थेचे बंगळुरू, कोलकता, जोरहाट, नवी दिल्ली, उदयपूर येथे प्रादेशिक केंद्र असून या संस्थेचे मुख्यालय हे नागपुरात आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content