Homeकल्चर +विमानतळ टर्मिनल इमारतींवर...

विमानतळ टर्मिनल इमारतींवर पारंपरिक वास्तुकलेचा प्रभाव!

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) विमानतळांवरील विविध टर्मिनल इमारतींच्या पारंपारिक आणि स्थानिक वास्तुकलावरील कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया हस्ते काल नवी दिल्लीत झाले. या पुस्तकात 19 विमानतळांवरील टर्मिनल इमारतींच्या दर्शनी भागावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पारंपारिक मूल्ये जपत आगामी विमानतळ टर्मिनल इमारतींचे चित्रण करणारा हा एक उल्लेखनीय प्रयत्न आहे.

भविष्यातील टर्मिनल्स, भारतीय स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्टतेचे व्यावहारिकतेसह कल्पकतेने मिश्रण करतील आणि आपल्या वारशाचे सार प्रभावीपणे व्यक्त करतील.

विमान आणि जमिनीवरील वाहतूक यांच्यात विमानतळ टर्मिनल इमारत सुविहित समन्वय साधते. हवाई प्रवासाशी संबंधित विविध सेवांसाठी माध्यम म्हणून काम करते. अभ्यागतांच्या मनावर शहराची पहिली छाप पाडणारे हे एक प्रवेशद्वार असते. या इमारती आता फक्त सोयीच्या साध्या संरचना राहिलेल्या नाहीत तर त्यांना शहराच्या खुणा, चकीत करणाऱ्या वास्तू म्हणून पाहिले गेले पाहिजे. त्या शहरात अभ्यागतांचे स्वागत करतात आणि प्रवाशांमध्ये विस्मय आणि आश्चर्याची भावना निर्माण करतात.

भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेचा वारसा प्रदर्शित करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्येयदृष्टी आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि तो जागतिक पटलावर आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्नांद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, भारतीय स्थापत्यकलेला विद्यमान आणि आगामी टर्मिनल इमारतींमध्ये कार्यात्मक सहजतेने सांगड घालत प्रत्येक प्रवासी किंवा मुसाफिराला भारतीय वारशाचे सार सांगण्याची कल्पना नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी मांडली. या टर्मिनल इमारती वारशाच्या भावनेने ओतप्रोत आहेत. त्यामुळे त्या केवळ संस्मरणीय संरचनाच नाहीत तर राष्ट्राच्या अस्मितेच्या प्रतीकात्मक अभिव्यक्ती देखील आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली, विमानतळ टर्मिनल्स संस्मरणीय आणि शहराच्या सौंदर्यात एक प्रतिष्ठित जोड म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. टर्मिनल इमारती या केवळ भौतिक घटक म्हणून उभ्या नसून भारताच्या संस्कृती, परंपरा आणि कलेचे प्रतिबिंब साकारणाऱ्या कल्पनेचे मूर्त स्वरूप आहेत. हे टर्मिनल्स स्थानिक समुदायांच्या अभिमानाचे प्रतीक आणि राष्ट्रीय प्रेरणेचे स्त्रोत बनले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे ओएसडी चंचल कुमार, बीसीएएसचे महासंचालक झुल्फिकार हसन, डीजीसीए विक्रम देव दत्त, एएआयचे अध्यक्ष संजीव कुमार, आदी मानायवर या वेळी उपस्थित होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content