Homeमुंबई स्पेशलकामगार एकता नागरी...

कामगार एकता नागरी पतपेढीची रौप्यमहोत्सवी सभा संपन्न

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)ची रौप्यमहोत्सवी अहवाल सभा कॉ. विठ्ठल घाग यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत काल मुंबईतल्या दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे पार पडली.

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)चे वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षांपूर्वी स्वान मिल कामगारांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून आपल्या गरजेपोटी ही पतपेढी सुरू केली. आज 25 वर्षांनंतर या पतपेढीत छोटे दुकानदार, भाजी विक्रेते, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिलाही सभासद झाल्या आहेत. या पतपेढीत 3860 सभासद आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या 7 कोटी 20 लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2 कोटी 45 लाखांची गुंतवणूक पतपेढीने केली आहे. 61 लाखांचे भागभांडवल उभे केले आहे. 5 कोटी 70 लाखांचे कर्जवाटप आतापर्यंत केले आहे. अशा तऱ्हेने 13 कोटींचा समिश्र व्यवहार या 25व्या वर्षी पतपेढीने केला आहे.

ही पतपेढी गिरणी कामगारांची पतपेढी म्हणून ओळखली जाते. पतपेढीने गिरणी कामगारांना घरांसाठी 3 कोटी 50 लाखांचे कर्जवाटपसुद्धा केले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या सभेत सभासदांचे गुणवंत विद्यार्थी, ठेवीदार, नियमित कर्ज फेडणारे कर्जदार, ज्यांनी या पतपेढीला मदत केली असे सर्व सन्माननीय सभासद तसेच रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अंध शाळेतील मुलांचा व अनाथ मुलांचा संचालक मंडळाच्या हस्ते सन्मान करुन त्यांच्या शाळेला आर्थिक मदतही करण्यात आली. सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. सर्व कर्मचाऱ्यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. कामगार क्षेत्रातील नेते कॉ. राजेंद्र कोरडे, कॉ. मनोज यादव, कॉ. अशोक पवार, गणेश घाग आदी मान्यवर तसेच सहकार क्षेत्रातील दिनेश नाईक उपस्थित होते.

यावेळी पतपेढीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या पतपेढीचे खरे मालक सर्व सभासद आहेत. तेव्हा तुम्ही भागभांडवल, ठेवी वाढावा. चांगले कर्जदार आणा. म्हणजे ही पतपेढी आपण आणखी मोठी करू. गिरणी कामगारांनी लढून मिळविलेले घर व ही पतपेढी वर्षानुवर्षे या मुंबई शहरात गिरणी कामगारांच्या लढ्याची ओळख जिवंत ठेवेल.

उपस्थित सर्व सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक, अध्यक्ष कॉ. विठ्ठल घाग, उपाध्यक्ष प्रवीण घाग, सेक्रेटरी शान्ताराम घाग, तज्ञ संचालक विलास घाग, प्रकाश गुणदेकर, सुधाकर गिरप, विनायक परब, मोहन कदम, यशवंत पाटेकर व खजिनदार उदय नेरुरकर हे संचालक उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रगिताने सभा संपविण्यात आली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content