Homeहेल्थ इज वेल्थभारतातील पहिले स्वदेशी...

भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर झाले लाँच!

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित, परवडणाऱ्या, हलक्या, अल्ट्राफास्ट, हाय फील्ड (1.5 टेस्ला), पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) स्कॅनरचा नवी दिल्ली येथे प्रारंभ केला.

स्वदेशी एमआरआय स्कॅनर उपलब्ध करून दिल्याने, एमआरआय स्कॅनिंगची किंमत सामान्य माणसासाठी लक्षणीयरीत्या परवडणारी होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सध्या उच्च दरात उपलब्ध असणारी एमआरआय स्कॅनिंग सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातून एमआरआय स्कॅनरच्या खरेदीतील भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुहेरी उद्दिष्ट तसेच आत्मनिर्भरतेचे एकूण उद्दिष्ट पूर्ण होऊन भारतातील निदान उपकरणे आणि उपचारात्मक उत्पादने अत्याधुनिक बनतील असेही ते म्हणाले. येत्या काही वर्षात “मेक इन इंडिया-मेड फॉर द वर्ल्ड” असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय बायोफार्मा मिशन अंतर्गत, व्होक्सलग्रिड्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने देशाची गरज पूर्ण करण्यासाठी कॉम्पॅक्ट, हलके, अत्याधुनिक एमआरआय स्कॅनर विकसित केला आहे, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

जागतिक दर्जाचे एमआरआय स्कॅनर विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या 17 कोटी रुपयांपैकी 12 कोटी रुपये जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (BIRAC) द्वारे प्रदान करण्यात आल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content