Homeकल्चर +'जाने भी दो...

‘जाने भी दो यारों’ विनोदीपटाचे पुन्हा झाले सादरीकरण!

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) रविवारी, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अभिजात संस्मरणीय असा चित्रपट “जाने भी दो यारों” चे विशेष सादरीकरण झाले. क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स इनिशिएटिव अंतर्गत अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या कालातीत विनोदीपटाचे पुन्हा सादरीकरण करुन भारतीय सिनेमाचा गौरवशाली वारशाचे दर्शन घडवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

जाने भी दो यांरो 1983 मधे प्रदर्शित झाला. या अप्रतिम चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शहा यांनी केले होते. अतिशय विनोदी पण विचार करायला लावणाऱ्या ढंगाने त्यांनी ही कलाकृती घडवली आहे. कारकिर्द घडवण्यासाठी धडपणाऱ्या दोन छायाचित्रकारांनी ही कथा आहे. ते दोघे भ्रष्टाचाराऱ्यांद्वारे जाळ्यात अडकवले जातात. दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी आणि रवी वासवानी यांनी या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच ओम पुरी, पंकज कपूर आणि सतीश शहांसारखे एकाहून एक सरस अभिनेते चित्रपटात आहेत. सामाजिक मुद्यांवर व्यंगात्मक भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडतो.

भष्ट्राचारी आणि शक्तीशाली लोकांच्या घोटाळ्यांभोवती अडखळत अतिसाहस करणाऱ्या दोन निरागसांभोवती ही कथा फिरते. दुर्दैव म्हणजे कधीच न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागते. समाजातल्या काळ्या गडद बाजूवर सिनेमा प्रकाश टाकतो. जाने भी दो यांरो हा केवळ अभिजात सिनेमाच ठरला नाही तर त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत खूप प्रेम आणि कौतुक मिळवलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासील तो सर्वाधिक लोकप्रिय, पसंतीच्या सिनेमांपैकी एक ठरला आहे.

चित्रपटाचा शेवट असलेले महाभारतातील पौराणिक दृश्य तर अविस्मरणीय आहे. विविध ओटीटी मंचावर असंख्य वेळा पाहिल्यानंतरही प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट झाल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाने (एनएमआयसी) – एनएफडीसी, क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स इनिशिएटिव्हच्या सहकार्याने, “जाने भी दो यारों” चे मुंबईतील एनएमआयसी इथे आयोजन केले होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content