Homeब्लॅक अँड व्हाईटवंदे भारत गाड्यांचा...

वंदे भारत गाड्यांचा एकूण वापर 99.60%!

चालू आर्थिक वर्ष, 2023-24 (जून 2023 पर्यंत) दरम्यान, वंदे भारत गाड्यांचा एकूण वापर 99.60% एवढा झाला आहे. परिचालन किंमत ही कर्षण ऊर्जा आणि कर्षण ऊर्जा वापर यासह विविध घटकांवर अवलंबून असते. विविध गाड्यांच्या परिचालन खर्चात कपात करण्याचा भारतीय रेल्वेचा सातत्याने प्रयत्न आहे. वंदे भारत रेकमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असून त्याचे मुख्य डिझाइन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यामुळे ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) मध्ये ब्रेकिंग उर्जा परतते आणि त्यामुळे कर्षण उर्जेचा वापर कमी होतो. 

ही माहिती रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

  • रेल्वेच्या वातानुलुकीत चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह वर्गात प्रवास करण्याच्या सुविधेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, यासाठी विभागीय रेल्वेचा मूळ भाड्याच्या कमाल 25% पर्यंत सवलत देण्याचा निर्णय
  • परिचालनाची किंमत कमी करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नाचाच हा भाग आहे.

विभागीय रेल्वेच्या वातानुलुकीत चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह वर्गात प्रवास करण्याच्या सुविधेचा अधिकाधिक प्रवाशांना लाभ मिळावा यासाठी, विभागीय रेल्वेने मूळ भाड्याच्या कमाल 25% पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. (2019 चे व्यावसायिक परिपत्रक क्रमांक 40, दिनांक 27.8.2019)

सर्व स्पर्धात्मक पद्धतींसाठी प्रवासाच्या पद्धतींचे विश्लेषण केल्यानंतर आणि भविष्यातील व्याप्तीचा अंदाज घेतल्यानंतर काही विभागांमध्ये स्पर्धात्मक भाड्याची प्रवाश्यांना संधी देण्यासाठी विभागीय रेल्वेने याविषयी अधिकृत धोरण स्वीकारले. त्याच तरतुदी काही किरकोळ सुधारणांसह वाढविण्यात आल्या आहेत. (2023 चे व्यावसायिक परिपत्रक क्रमांक 11, दिनांक 8-7-2023) रेल्वेमधील प्रवासासाठी भाडे निर्धारित करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content