Homeमुंबई स्पेशलतुळशीपाठोपाठ विहार व...

तुळशीपाठोपाठ विहार व तानसा तलावही लागले वाहू…

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आज मध्यरात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी; तर तानसा तलाव पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला, अशी माहिती पालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात २० जुलै २०२३ रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ तानसा व विहार हे दोन्ही तलावदेखील आज ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ३ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव वर्ष २०२१ मध्ये १८ जुलै रोजी, वर्ष २०२० मध्ये ५ ऑगस्ट रोजी; तर वर्ष २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तानसा तलावाचा विचार करता, १४,४९४.६ कोटी लीटर (१४४,९४६ दशलक्ष लीटर) एवढी त्याची कमाल जलधारण क्षमता आहे. हा तलाव गतवर्षी दिनांक १४ जुलै २०२२ रात्री ८.५० वाजता, दिनांक २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता; तर त्याआधीच्या वर्षी दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८५,२९५.७ कोटी लीटर (८५२,९५७ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. मुंबई महानगराच्या वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा ५८.९३ टक्के इतका आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content