Homeमुंबई स्पेशलधारावी पोलीसठाण्यात महिला...

धारावी पोलीसठाण्यात महिला समुपदेशन केंद्र चालवायचंय?

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीसठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील आठ दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

अर्जदार संस्था ही नोंदणीकृत तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील (स्थानिक) महिला पदाधिकारी असलेली असायला हवी. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेशन क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. जास्त अनुभव असल्यास प्राधान्य, समुपदेशनासाठी MSW उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे हा उद्देश असावा. संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट जोडावे. अर्ज करताना संस्थेने कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी. संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत, तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र जोडावे.

संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे. संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडावे. तसेच ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई शहर, १९७ बी.डी.डी. चाळ पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे संपर्क साधावा.

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवा

राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या चार वर्षांच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याबाबत‍ अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, 117, बी. डी. डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई-4000018, येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...
Skip to content