Homeन्यूज अँड व्ह्यूजया हाताचे त्या...

या हाताचे त्या हाताला समजत नाही ते सरकार!

या कानाचे त्या कानाला कळू द्यायचे नाही, ही झाली गोपनीयता. पण सरकारी कामकाजात या हाताचे त्या हाताला कळत नाही, इतका गोंधळ असतो, याचे प्रत्यंतर मंत्री उदय सामन्त यांनी मंगळवारी विधानसभेत दिलेल्या उत्तराने आले.

ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या परिणामस्वरूप सात लाख झाडांचे अस्तित्त्व नष्ट होण्याचा धोका आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे निदर्शनाला आणले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री सामन्त यांनी झाडांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे सांगत विकासकामांच्या वेळी कापावी लागलेली झाडे, पुनर्रोपण केलेली झाडे यासंदर्भातला तपशील सादर केला.

झाड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत संबंधितांच्या वारसांना कोणतीही मदत मिळाली नाही आणि महापालिकेत नोकरीही दिली गेली नाही, असे प्रभू यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री सभागृहात नसल्याने नगरविकास खात्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी उद्योगमंत्री सामन्त यांच्याकडे होती. त्यांनी दिलेल्या उत्तरातून शासकीय कारभाराची अवस्था हा हाताचे त्या हाताला समजत नाही, अशीच असल्याचे स्पष्ट झाले.

हाताला

ठाणे महापालिकेच्या हद्दीत वृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला पालिकेत नोकरी देण्यात आली होती. पण, शासनाने नंतर ती नाकारली. त्यामुळे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याबद्दलचा प्रस्ताव १५ दिवसात शासनाला पाठवण्यात येईल, असे उत्तर सामन्त यांनी दिले. वास्तविक, सामन्त राज्य शासनाच्या वतीनेच उत्तर देत होते आणि शासनाला प्रस्ताव पाठवला जाईल, असे सांगत होते.

ठाणे शहर क्षेत्रातील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत – पादचारी सुधारणा प्रकल्पाच्या माध्यमातून क्षेत्राधारित विकासांतर्गत एकूण 21 रस्त्यांवरील 23.40 कि.मी. लांबीच्या पदपथाच्या नूतनीकरणाचे काम माहे ऑक्टोबर, 2022 पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी पदपथाचे रुंदीकरण, स्टॅम्प काँक्रिट व शहाबाद लादी पद्धतीने नूतनीकरण, स्ट्रिट फर्निचर, ट्राफिक साईनेजेस इ. कामे करण्यात आली असून या पदपथावर अस्तित्त्वात असलेल्या झाडांभोवतीची जागा सोडून आवश्यकतेनुसार ट्री-गार्ड किंवा वीट बांधकाम इ. संरक्षित करुन लाल माती टाकण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल दावा क्र. 7 / 2015 मध्ये निर्गमित झालेल्या आदेशास अनुसरून ठाणे महानगरपालिका हद्दीतील वृक्षांच्या खोडाच्या सभोवतालचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण काढणे जेणेकरुन वृक्षाच्या मुळांना हवा व पाणी उपलब्ध होईल, या दृष्टीकोनातून 5 फेब्रुवारी, 2016 रोजी महानगरपालिका स्तरावर परिपत्रक निर्गमित केले आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडण्याचे कारण निश्चित करण्याबाबतही चार सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून  त्याच्या तांत्रिक अभिप्रायानुसार सिमेंट मुक्त / De-concretization करण्यात दि.31 मार्च 2018 अन्वये महानगरपालिकेने आदेश पारित केला आहे. या कार्यालये, इमारती इतर स्थावर मालमत्तेच्या जागेतील सर्व वृक्षांसभोवती 3  बाय 3 फूट जागा उपलब्ध करून ती सिमेंट मुक्त/De- concretization करणे इ. उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहेत, असेही सामन्त यांनी स्पष्ट केले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content