Homeहेल्थ इज वेल्थमुंबई मनपाच्या प्रसूतिगृहातील...

मुंबई मनपाच्या प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना संवादाचे धडे

गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रसूतिगृहात येणाऱ्या रूग्णांसोबत अधिक सौजन्य आणि समाधानपूर्वक संवादाचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारीवर्गाला ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुढाकार घेण्यात येणार आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – TISS) या संस्थेद्वारे ‘वर्तन बदल संवाद’ प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा एकूण ४२ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व प्रसूतिगृहांमध्ये मिळून एकूण ५८ प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचारी हा संपर्काचे पहिला घटक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी विश्वास आणि संबंध निर्माण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पहिली छाप अत्यंत महत्त्वाची आहे. आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक वृत्ती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्‍यांचे ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याची सतत गरज असल्याने सातत्याने समोर आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण ३० प्रसूतिगृहे आहेत व तेथे वर्षाला साधारणत: १७ हजार प्रसूती होतात. ८ हजार ६०० शस्त्रक्रिया, ५ लाख २८ हजार बाह्यरुग्ण तपासणी होतात. प्रसूतिगृहांमध्ये एकूण कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या अंदाजे १ हजार ८०० आहे. प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, रुग्णांशी सुसंवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य कार्यशाळा (Behavior Change Communication) महत्त्वाची ठरणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content