Homeकल्चर +अल्ट्रा झकासवर लवकरच...

अल्ट्रा झकासवर लवकरच ‘हिरा फेरी’!

मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अल्ट्रा झकास ओटीटी सातत्याने नवनवे चित्रपट निर्माण करून आपल्या रसिक प्रेक्षकांचे लाड पुरवत आहे. प्रेक्षकांची आवड ओळखून, लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपट कलाकृती तयार करण्याचा चस्का अल्ट्राला लागला असून महाराष्ट्रातील ग्रामीण-शहरी प्रेक्षकांच्या पसंतीचे खुमासदार विषय आणि त्याला मनोरंजनाचा झकास गावरान तडका असं भलंमोठ्ठं पॅकेज प्रेक्षकांना फक्त याच ओटीटीवर पाहायला मिळत असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. ‘बोल हरी बोल’ या सुपरहिट चित्रपटानंतर असाच रंजक फॉर्मुला घेऊन दिग्दर्शक अमोल बिडकर ‘हिरा फेरी’ करण्याच्या तयारीत आहेत.

‘हिरा फेरी’ या चित्रपटात कॉमेडी क्वीन अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि ‘बॉईज २’ फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे यांची जोडी बहर आणणार असून त्यांच्यासोबत अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडी स्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केले असून ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.’चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठी मनोरंजना वसा जपणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ची ‘हिरा फेरी’ ही मराठी प्रेक्षकांसाठी ‘श्रावण भेट’ असून कुटुंबातील सगळ्यांना एकत्र बसून ओटीटीवर पाहता येईल असे निखळ मनोरंजन करणाऱ्या कलाकृतींच्या निर्मितीवर ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.’ भर देत असून ‘हिरा फेरी’ सर्वांचे निखळ मनोरंजन करण्यात नक्की यशस्वी होईल, असा विश्वास सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content