Homeमुंबई स्पेशलराष्ट्रवादी पक्ष तसेच...

राष्ट्रवादी पक्ष तसेच चिन्ह जाऊ देणार नाही!

आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याबद्दल माझं काही मत नाही. पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली. असं असलं तरी काही केलं तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडलेल्या समर्थकांच्या एका मेळाव्यात ते बोलत होते. जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले.

आज राष्ट्रवादीच्या स्थापनेला २४ वर्षे पूर्ण झाली. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीची फळी तयार केली. यामध्ये अनेकजण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक नवीन नेते तयार केले. या नेत्यांना तयार करताना त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बनवायचा होता. राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचायचं हा विचार होता. आज आपल्यासमोर संकटे आहेत. ज्यांचे विचार देशाच्या हिताचे नाहीत त्यांच्या हातात आज देशाची सूत्रे आहेत. लोकशाहीमध्ये विरोधी असो वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद असावा लागतो. जो काही निर्णय घेतला जातो त्यावर सर्वसमान्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. आज देशामध्ये हा संवाद नाही, असेही पवार यांनी सांगितले.

देशातील विरोधक एकत्र येत असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अस्वस्थ होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादीने ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटलं, मग दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवाल त्यांनी केला. विरोधकांना एकत्रित करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचंही त्यांनी सांगितले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content