Homeबॅक पेजआदित्य ठाकरेंना संपवणारा...

आदित्य ठाकरेंना संपवणारा शकुनी मामा वरूण सरदेसाई!

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना संपवले. आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंना संपवणार, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

काल रात्रीच समजले की, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय, त्यांचे लाडके राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हा त्यांच्यासाठी मोठा वैयक्तिक तसेच राजकीय  धक्का आहे. यांना सर्वस्वी वरूण सरदेसाई जबाबदार आहेत. वरूण सरदेसाईंमुळेच आदित्य ठाकरेंजवळ कोणी उरले नाही. कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईंचे नाव पुढे येऊ शकते. त्या काळात अनेक टेंडर देण्यात हे सरकारी भाचे म्हणून ओळखले जाणारे वरूण सरदेसाई आघाडीवर होते, असेही ते म्हणाले.

वरूण

वरूण सरदेसाईदेखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्ली, नागपूर… कुठे कुठे बैठका झाल्या हे सांगू का? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कायमचे रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.

आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि  राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योद्धे सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीच वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

वरूण

संजय राऊत म्हणाले की शरद पवार समजायला भाजपाला १०० वर्षे लागतील. आम्हाला जर १०० वर्षे लागत असतील तर त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना २०० वर्षे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...
Skip to content