Homeकल्चर +बालकुमार साहित्य संमेलनाच्या...

बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे!

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथे घेण्यात येणारे दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांच्या नावाची घोषणा उज्जैनकर यांनी केली व सर्वांनी लता गुठे यांच्या नावाला एकमताने अनुमोदन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

गेली वीस वर्ष लता गुठे ह्या साहित्यिका, संपादिका, प्रकाशिका. बाल साहित्यिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. लता गुठे ह्या एम्.ए.बी.एड्. असून त्या संतसाहित्य ते बालसाहित्य अशा विविध विषयावर सातत्याने लिखाण करतात. त्यांची एकूण २० पुस्तकं प्रकाशित आहेत. ‘मोहक युरोप’, ‘जीवनवेल’, ‘मी आहे तिथे’ संत चैतन्याचा मेळा, मना मना दार उघड, ‘पुन्हा नव्याने’, (कवितासंग्रह) शोध अस्तित्त्वाचा (कथासंग्रह), ‘इटुकले पिटुकले’, चांदनबाग, ‘बिन भिंतीची शाळा (बालकथा) काव्य कोडी तसेच मुलांसाठी चेरीलँड नावाचे मासिकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

गीतलेखन- ‘स्वप्नकळ्या’ व ‘माझं प्रेम’ या ध्वनिमुद्रिकांचीनिर्मिती (ऑडिओ सीडीज), साम मराठी टी.व्ही. वाहिनीवरील ‘रुणुझुणू’ मालिकेला गीतलेखन त्यांनी दिले आहे. भरारी प्रकाशनच्या माध्यमातून २००हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. गेली बारा वर्षं ‘धमाल मस्ती’ व तार्‍यांचे जग या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन व संपादन करत आहेत. विविध महत्त्वाच्या संस्थांचे एकूण ४८ राज्यस्तरीय पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष तसेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखा कार्यवाह म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content