Homeमुंबई स्पेशलपथविक्रेत्यांना मिळणार ५०...

पथविक्रेत्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत आणखी कर्ज

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्राप्त मार्गदर्शक सूचना व महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. तसेच या दहा हजार रुपयांची परतफेड केल्यास सदर पथविक्रेत्यास आणखी २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. संबंधित कर्जदार पथविक्रेत्याने या २० हजार रुपयांची परतफेड केल्यास त्यास आणखी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.

अद्याप मुंबईतल्या ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नसल्यास त्यांनी ते व्यवसाय करीत असलेल्या सबंधित विभाग कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांच्याशी संपर्क साधून, संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विभाग कार्यालयातून करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

कोविड संसर्गामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. तेव्हापासून त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत साधारणपणे ९० हजार पथविक्रेत्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर २०२४पर्यंत लागू असून, अद्याप  ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तत्काळ संबंधित विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात येत आहे.

असा करा अर्ज

संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्याने स्वत: व्यवसाय करणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेतल्यास “स्वनिधी से समृद्धीतक” या पंतप्रधानांच्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटूंबास प्राप्त होणार आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content