Homeकल्चर +साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे...

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न!

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह येथे नुकताच एकपात्री अभिनय स्पर्धा आणि महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत साहित्यिक आणि कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी वय वर्षे ६ ते १५ आणि १६ व त्यावरील अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनप्रसंगी संपादक आणि लेखक उमाकांत वाघ, तानसा ग्लोबल स्कुल चे उपाध्यक्ष तुकाराम पष्ठे -प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील-कोल्हापूर, साहित्यिक सचिन कुसनाळे-सांगली, संगीतकार -मिलींद वाणी-डोंबिवली, आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा-माहूर, नाट्य-सिने अभिनेता शिवाजी शिंदे-कल्याण, नाट्य अभिनेता रमेश मुनेश्वर-नांदेड, रांगोळीकार मच्छिंद्र वैती-विरार पालघर उपस्थित होते.

यावेळी कला व साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा मान्यवरांना राज्यस्तरिय साथी साहित्यभूषण व कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात नाट्य अभिनेता-दिग्दर्शक रमेश मुनेश्वर-नांदेड, आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा-माहूर, सिना-नाट्य अभिनेता शिवाजी शिंदे-कल्याण ठाणे,  सिने संगीतकार,तबला वादक-मिलींद वाणी-डोंबिवली,  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक साहित्यिक  डॉ. श्रीकांत पाटील-कोल्हापूर, शोध साहित्यिक सचिन कुसनाळे- सांगली, प्रा.डॉ. महेंद्रकुमार पगारे मराठी विभाग प्रमुख उमवी-जळगाव, संत साहित्यिक प्रा. संपत गर्जे-पुणे, प्रसिध्द रांगोळीकार मच्छिंद्र वैती-विरार पालघर तसेच साहित्यासाठी कार्य करणाऱ्या वृत्तपत्रासाठीचा “साथी साहित्य मित्र” पुरस्कार संपादक उमाकांत वाघ विरार यांना संन्मानित करण्यात आले.  एकपात्री अभिनय स्पर्धेत ५ वर्षापासून ७६ वर्षापर्यंतच्या स्पर्धक कलाकावंतानी आपली कला सादर करुन उपस्थिताःची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोतारणे, नेहा धारुळकर आणि डॉ अनुपमा जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साथी परिवाराचे अध्यक्ष नटराज मोरे, सचीव सौ. अनुराधा धामोडे, नाट्य विभाग प्रमुख नाट्य टि.व्ही.चित्रपट अभिनेता-दिग्दशॆक निर्माता भरत जगताप, सहसचिव विजय जोगमार्गे,  कोकण विभाग अध्यक्ष अडॅ. नेहा धारुळकर, सल्लागार डॉ. अनुपमा जाधव, योगेश गोतारणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content