Homeकल्चर +'लेट्स इमॅजिन टूगेदर'ने...

‘लेट्स इमॅजिन टूगेदर’ने रंगविली वाड्यातली शाळा!

नव्या वर्षात पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश करताना मुलांचे विविध प्रकारे स्वागत होताना आपण पाहतोच. हा उत्साही आनंद एक दिवसापुरता न राहता पूर्ण वर्षभर मिळावा, या हेतूने मुंबईतल्या दहिसरच्या ‘लेट्स इमॅजिन टूगेदर’ या संस्थेने ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील मोज येथील जिल्हा परिषद शाळा आतून बाहेरून बदलून टाकली.

शाळेच्या मळकट, एकरंगी भिंती पाहून विद्यार्थी वर्षभर कंटाळून जाऊ नये, म्हणून चित्रकार प्राची व श्रीबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्ग, प्रसाधनगृहे तसेच शाळेच्या बाहेरील व आतील सर्व भिंती आधुनिक संकल्पनेनुसार रंगविण्यात आल्या. यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ३ दिवस कष्ट घेतले. यात विद्यार्थ्यांना भित्तीचित्रणाचा विषय ठरविण्यापासून ते रंग कसे मारावेत इथपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले.

पावसाळ्यातला अपुरा सूर्यप्रकाश पाहता छतावर पारदर्शी पत्रे बसविण्यात आले. प्रत्येक वर्गासाठी टेबलफॅन, पुस्तकासाठी रॅक दिले गेले. पूर्ण शाळेत स्वच्छता व आकर्षक मांडणी करण्यात आली. या उपक्रमासाठी लागणारी स्थानिक पातळीवरची जबाबदारी शाळेचे प्रयोगशील शिक्षक किशोर कोठाळे यांनी उचलली. संस्थेचा हा पायलट प्रोजेक्ट असून लोकसहभागातून अधिकाधिक मदत मिळवून वाड्यातील इतर दूर्गम भागातील शाळांना वर्षभरात सुशोभित करण्याचा संकल्प संस्थेचे सदस्य ओंकार, मानसी व मिहीर यांनी केला आहे. या परिसरात विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, पालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वर्षभरात सुसंवादी बैठका घेणार आहोत, असे संस्थाध्यक्षा पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content