Homeकल्चर +‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये...

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये रविवारी नारायण राणे!

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…

अवधूत गुप्ते- संजय राऊत म्हणतात, नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचापुढचा विचार न करता…

नारायण राणे- याला खासदार मी केला. नाहीतर झालाच नसता. हे माझे पाप आहे. (फोनवरून…) जय महाराष्ट्र उद्धवजी… नारायण राणे बोलतोय…

अवधूत गुप्ते- आमदार उचलून आणणे. त्यांना इकडे ठेवणे… मस्त सरकार पाडणे, यात तुमची मास्टरी झाली होती. आता तुम्ही बघताय की, हेच त्यांच्याबरोबर झालं… जर तुम्ही आता सेनेत असता तर हे होऊ न देण्यासाठी तुम्ही काय केले असते?

नारायण राणे ही परिस्थिती यांनीच आणली आम्ही सगळे जायला… मी सेनेत असतो तर सेनेची अशी अवस्थाच झाली नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता. चाळीस तर सोडाच…

अवधूत गुप्ते- बाळासाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले. त्यानंतर त्यांनी असे काही ओरिएंटेशन दिले का, की राणे तुमच्याकडून मला ही अपेक्षा आहे…

नारायण राणे- साहेबांना जे वाटायचं राज्यकारभाराबद्दल… ते मला चांगलं माहित असल्यामुळे… साहेबांना हे माहिती होतं, याला मला सांगायची गरज नाही.

अवधूत गुप्ते- साहेबांनी तुम्हाला बोलवून कधी पाठीवर कौतुकाची थाप मारली का?

नारायण राणे कुठले नवीन पुस्तक आले आणि ते मला द्यायचे झाले असेल तर साहेब मला बोलावून ते द्यायचे. त्यावर लिहायचे… ‘माझा शिवसैनिक प्रिय नारायण राणे…’ नुसता, ‘नारायण राणे’ म्हणून कधी पत्र दिले नाही.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content