Homeकल्चर +ऐतिहासिक तोफांनी वाढविले...

ऐतिहासिक तोफांनी वाढविले मुंबईतल्या दोन उद्यानांचे सौंदर्य!

समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६७ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पौलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी आढळून आल्या होत्या. घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या तोफा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत असून अनेक नागरिक या दोघांसह आपला ‘सेल्फी’देखील आवर्जून घेत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे पुरातन वास्तू जतन अभियंता खाते ज्यांच्या अखत्यारीत येते, त्या इमारत परीक्षण खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले की, घाटकोपर पूर्व परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी दोन जुन्या तोफा आढळून आल्या होत्या. या तोफांना एक नवी झळाळी मिळण्याच्या दृष्टीने व त्या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अनुरुपता जपत पुनर्स्थापना करण्यासाठीचा एक विशेष प्रस्ताव पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे पुरातन वास्तू ज़तन खात्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार आवश्यक तो अभ्यास करुन या दोन्ही तोफांची आता पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसविण्यात आल्या आहेत.

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील चाकांचा घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन‌ १८५६ या‌ वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपीमध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे १६७ वर्षे जुन्या असणार्‍या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या बुरुजासमान चबुतऱ्यावर पुनर्स्थापित केल्यामुळे आता या ऐतिहासिक ठेव्याला नवा‌ रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांनादेखील एक ऐतिहासिक स्पर्श असलेली विरंगुळ्याची आणखी दोन ठिकाणे उपलब्ध झाली आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content