Homeकल्चर +‘जननी’चा वर्ल्ड डिजिटल...

‘जननी’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या सोमवारी!

आईच्या मातृत्वाची कथा सांगणारा ‘जननी’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ येत्या २९ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर होत आहे. मागील आठवड्यात मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले होते.

जननी या चित्रपटाची कथा विचारप्रवर्तक आणि भावनिकरित्या मातृत्वाच्या नातेसंबंध, कौटुंबिक बंध आणि वैयक्तिक वाढ यांच्या गुंतागुंतीचे वर्णन करून मांडण्यात आली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या ‘जननी’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, मोहनीश बहल, आयेशा झुल्का, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे, तर निर्मिती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी केली आहे. आता हाच चित्रपट संपूर्णपणे मराठी भाषेत प्रेक्षकांना अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

या बहुचर्चित चित्रपटाविषयी बोलताना अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, कलाकारांची उत्तम फळी लाभलेला आमचा हा चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. तत्कालीन परिस्थितीत सरोगसीसारख्या विषयावर प्रकाश टाकणारा विषय आम्ही ‘जननी’ चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘अल्ट्रा झकास’ ॲप डाऊनलोड करून अमर्याद आनंद घेण्यासाठी खालील लिंक…

App link: https://ultrajhakaas.app.link

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content