Homeटॉप स्टोरीखंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव...

खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव कसा कळणार?

राममंदिर समर्पण निधीवर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा, असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकर्‍यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे. उणे 30 डिग्री तापमानात शत्रूचा मुकाबला करून चीन सैनिकांना मागे धाडणारे आपले शूर सैनिक आहेत. त्यांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले नाही, असे सांगताना सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो आहोत, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. वीर सावरकर यांच्याबाबत ही टिपण्णी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. यातूनच त्यांचे सावरकरप्रेम दिसून येते, असेही फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात ते जे बोलले ते उसने अवसान आणून खोटे बोलले. सत्य त्यांना ठाऊक आहे. या संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही. शरजिलबाबत बोलण्याची त्यांची हिंमत नाही. तो पुण्यात येतो, हिंदूंना सडका म्हणून जाण्याची त्याची हिंमत होते. पण, त्याला पकडण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. शिवसेना स्वातंत्र्यसंग्रामात नव्हती, हे त्यांनी सांगितले हे बरेच केले. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार स्वत: एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे. भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले. सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच आजच्या मुख्यमंत्र्यांचे भाषणसुद्धा दिशाहीन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content