Homeमुंबई स्पेशलअनेक मान्यवरांनी दिला...

अनेक मान्यवरांनी दिला महाडेश्वरांच्या आठवणींना उजाळा 

मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांचे गेल्या मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाने सर्वपक्षीय शोकसभा रविवारी मुंबईच्या सांताक्रूझ (पूर्व) बिल्लवा भवन येथे आयोजित केली होती. सुमारे अडीच तास चाललेल्या या शोकसभेत सर्वपक्षीय 17 मान्यवरांनी महाडेश्वर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाडेश्वर यांची पत्नी, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगी प्रांजल आणि मुलगा प्रसाद उपस्थित होते. सुरूवातीला ब्रह्मकुमारी सांताक्रूझ केंद्राच्या कमलाबेन दीदी यांनी शांती प्रार्थना म्हटली.

आमदार अनिल परब यांनी महाडेश्वर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचा जीवनपट उलगडला. सर माझ्या आयुष्यातले अविभाज्य घटक होते. ते माझ्या प्रवासात माझे जवळचे साथीदार होते. प्रत्येक गोष्टीत त्यांची मला साथ होती. पक्षाचे काम करताना ते कधीच तब्येतीचे कारण सांगत नसायचे. महाडेश्वर आणि पालिका एक समीकरण होते. त्यांचा जातीचा दांडगा अभ्यास होता. ओबीसीमध्ये वैश्यवाणी समाजाला स्थान मिळण्यासाठी त्यांनी लढा दिला. विधान परिषदेत पालिकेच्या प्रश्नांवर ते मार्गदर्शन करत असत. मुंबईचे तसेच शिक्षणाचे प्रश्न विचारा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांचा अभ्यास, वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे जबरदस्त माहितीचे स्त्रोत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने माहितीचा झरा कायमचा बंद झाला आहे, असे ते म्हणाले.

माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, इतक्या लवकर आदरांजली वाहण्याची वेळ येईल असे स्वप्नात वाटले नव्हते. मृदू स्वभाव, विनम्र, सतत वाचन करणारे हाडाचे ते शिक्षक होते. गरीब वस्तीत त्यांनी मराठी शाळा काढली. सर्वसामान्य माणसांना आत्मीयता वाटणारे असे ते नेते होते. त्यांच्या जाण्याने या भागाचे व महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.

आमदार रमेश कोरगावकर म्हणाले की, राजकीय कार्यातले ते माझे गुरू होते. मला तिसऱ्या वेळा नगरसेवकपद मिळण्यात त्यांचा सिहाचा वाटा होता. समाजात सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सभागृहात बोलायला लावणारे, अग्रलेख वाचा असे आग्रह करणारे, सुख-दुःखात ते धावून येणारे, असे लोभस व्यक्तिमत्व म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर होते.

माजी नगरसेवक सदा परब म्हणाले की, गेली अनेक वर्षे 1992पासून आजपर्यंत त्यांचा माझ्याबरोबरचा प्रवास होता. पुस्तक वाचा, लेख वाचा, पेपर वाचा, अग्रलेख वाचा असा त्यांचा आग्रह होता. ते महापौर असताना अडीच वर्षे त्यांच्या स्पेशल केबिनमध्ये व महापौर बंगल्यात जाण्याची संधी मिळाली. ते महापौर झाले, पण पाय जमिनीवर होते. त्यांचा हसरा चेहरा ही त्यांची मौल्यवान ठेव होती.

माजी नगरसेवक मनोहर चौकर म्हणाले की, शाखाप्रमुख असताना 1992मध्ये दंगलीत त्यांना सहा महिने कारावास झाला होता. त्यांची राजकीय वाटचाल खडतर होती. माजी नगरसेवक रवी भोसले म्हणाले की, त्यांच्या आठवणी आपल्याला प्रेरणा देत राहतील. कुडाळमधून मुंबईत येऊन त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नामनिर्देशित नगरसेवकांना बोलण्याची सभागृहात संधी मिळाली पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास होता. सभागृहात मुंबईच्या प्रश्नावर त्यांनी पहाटे 4-5 वाजेपर्यंत सभा घेतल्या. त्यांचे वाचन दांडगे होते. मराठी भाषेसाठी ते आग्रही होते.

माजी नगरसेवक चंद्रकांत पवार म्हणाले की, त्यांच्या मृत्यूपूर्वी काही तास मी आणि त्यांचे भाऊ त्यांच्या घरी त्यांना शेवटचे भेटलेले व्यक्ती होतो. यावेळी अनेक गप्पागोष्टी झाल्या. सुमारे दोन तास आम्ही त्यांच्या घरी होतो. त्यांचे पुस्तकाचे दांडगे वाचन होते. ते दयाळू, प्रेमळ, सुस्वभावी होते. यावेळी महापौरांना त्याच्या कामात मदत करणारे अनिल त्रिवेदी, शिवजी सिंह, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, कोल्हापूरचे राजू समेळ, भाजपचे लोकेश मालुसरे, त्यांचे जुने मित्र दशरथ शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश लंगोटे, काँग्रेसचे सुवर्णा, राजुल पटेल आदी मान्यवरांनी प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content