Homeपब्लिक फिगरआपल्या १४-१५ आमदारांना...

आपल्या १४-१५ आमदारांना आधी राजीनामा द्यायला सांगा!

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या 14-15 आमदारांना उद्याच्या उद्या राजीनामा देण्यास सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कालपासून उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत नैतिकतेची भाषा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र लढली होती. त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीची मतेही पडली होती. त्यामुळे नैतिकता दाखवायची असेल तर भाजपाच्या मतांचा मदतीने निवडून आलेल्या या चौदा-पंधरा आमदारांनी आपल्या पदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मग नैतिकतेच्या गोष्टी लोकांना सांगाव्या असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने मांडलेल्या आठ विविध याचिकांपैकी सहा याचिका फेटाळलेल्या आहेत. राजकीय पक्ष निश्चित करण्यासाठी तसेच अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्षांकडे असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चवताळलेल्या ठाकरे गटाने आता अध्यक्ष घटनाबाह्य आहेत, अशी भाषा बोलायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत असलेले आमदार आणि तसेच कार्यकर्ते टिकवण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी आता यांनीही आवई उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे सरकार घटनाबाह्य नसून कायदेशीर आहे असेही स्पष्ट केलेले आहे. याआधी हे सरकार तीन महिन्यांत कोसळेल असे सांगत कार्यकर्त्यांना थोपवून धरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. ते आता साध्य होत नाही, हे सरकार टिकणार आहे हे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारून आपली बाजू कशी योग्य होती, हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे असेही शिंदे यांनी सांगितले. नेहमी दुटप्पी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे कालपासून नैतिकतेचे धडे देत आहेत. आपल्याला नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपद नको म्हणून सांगणारे ठाकरे यांनी न्यायालयाकडे आपल्याला परत मुख्यमंत्रीपदी नेमावे म्हणून याचिका दाखल केली होती. सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे असे सांगून स्वतः मुख्यमंत्री झाले. बारसू येथे रिफायनरी करायची असं पत्र स्वतः दिले आणि आंदोलनही स्वतःच करत आहेत. हा सगळा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आजही त्यांचे कार्यकर्ते तसेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचेही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. खासदार राहुल शेवाळे, संजय शिरसाट आदी नेतेही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content