Homeकल्चर +निर्मला सीतारामन यांच्या...

निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले ‘रिफ्लेक्शन्स’चे प्रकाशन

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत, प्रसिद्ध बँकर नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. भारताच्या वित्तीय परिदृश्यातील अनेक दशकांच्या वाघुल यांच्या अनुभवांची स्पष्ट आणि तपशीलवार नोंद या पुस्तकात आहे. या प्रकाशन सोहळ्याला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या राष्ट्रीय बँकेचे (एनएबीएफआयडी) अध्यक्ष के. व्ही. कामथ, पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल, जेपी मॉर्गनच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाच्या माजी अध्यक्ष कल्पना मोरपारिया यांच्यासह प्रख्यात बँकर्स आणि आघाडीच्या वित्तीय संस्थांचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

नारायणन वाघुल यांचा बँकिंगमधील व्यापक अनुभव आणि त्यांच्या नेतृत्त्वगुणांसाठी निर्मला सीतारामन यांनी त्यांची प्रशंसा केली. नेत्यांना घडवण्यासाठीचे त्यांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले ज्याची संस्मरणीय छाप उमटली आहे. वाघुल यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कल्पना आणि दूरदृष्टीवर सीतारामन यांनी प्रकाश टाकला. आर्थिक सेवांमध्ये महिला अधिक संख्येने नेतृत्त्व स्वीकारत असल्याने भारतासाठी या कल्पना आणि दृष्टीकोन कायम समर्पक आणि मौल्यवान राहतील, असे त्या म्हणाल्या.

भारतातील आधुनिक बँकिंगचे शिल्पकार मानले जाणारे वाघुल यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील नाट्यमय, मनोरंजक आणि अनेक महत्त्वपूर्ण घटना शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत. चित्तवेधक किस्से अंतर्भूत असलेले हे पुस्तक विविध उपक्रमांना स्पर्श करते.

वाघुल यांनी स्थापित केलेल्या प्रक्रिया भारतीय आर्थिक व्यवस्थेतील बळकट आणि शाश्वत पद्धती बनल्या. बँकिंग प्रतिभेच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि बँकिंगमध्ये अधिकाधिक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी घडवले. यामुळे स्त्री-पुरुष समानता संस्कृती वाढीला लागली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content