Homeकल्चर +वीर सावरकर: फाळणी...

वीर सावरकर: फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक क्रांती आणि हिंदुत्व याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांचे अनेक महत्त्वाचे पैलू सर्वांनाच ज्ञात नाहीत. अशावेळी वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे सर्व पैलू ज्ञात होतील, असे पुस्तक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिले आहे. ‘Veer Savarkar: The Man who could prevented partition’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले आहे. ‘वीर सावरकर: फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ असे अनुवादित पुस्तकाचे नाव आहे.

उद्या गुरुवारी, २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वीर सावरकर राष्ट्राची सुरक्षा आणि विदेशनीती यासंदर्भातील द्रष्ट्ये राष्ट्रनायक होते. या देशाला असणारा फाळणीचा धोका सर्वात आधी ओळखून ती टाळण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणारे खरेखुरे राष्ट्रनायक. वीर सावरकरांचे राष्ट्रीय विचार जर स्वातंत्र्यपूर्व काळात ऐकले गेले असते, तर  फाळणी टळली असती. त्यांच्या विदेशनीतीची सूत्रे आणि दूरदृष्टी लक्षात घेऊन जर धोरणे आखली असती, तर सीमा सुरक्षित राहिल्या असत्या. वीर सावरकर यांच्या या द्रष्टेपणाच्या गुणावर सविस्तर प्रकाशझोत या पुस्तकात टाकण्यात आला आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content