Homeमुंबई स्पेशलसंसदरत्न खासदार गोपाळ...

संसदरत्न खासदार गोपाळ शेट्टी यांचा गोरेगावच्या संघटनांकडून नागरी सत्कार

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार नुकताच नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला. खासदार गोपाळ शेट्टी सर्वोच्च संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्धल उत्तर मुंबईत ठिकठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी व विविध संस्थांनी सत्कार सोहळा आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा गोरेगावच्या गुजराथी समाज व १७ संघटनानांनी त्यांचा नागरी सत्कार केला. त्यांचे पालिकेचे एकेकाळचे सहकारी व मुंबईचे माजी उपमहापौर दिलीप पटेल यांनी पुढाकार घेत या सत्कार सोहळ्याचे गोरेगाव पश्चिम येथील जवाहर नगर हॉल मध्ये आयोजन केले होते. यावेळी स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, माजी प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल, भाजपचे येथील माजी नगरसेवक, पदाधिकारी व गुजराथी समाज बांधव व प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप पटेल व येथील गुजराथी समाज आणि १७ संस्थांनी गोरेगावकरांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित केल्या बद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य नगर येथील एका झोपडपट्टीतून आपले सामाजिक कार्य सुरू करून आज खासदार पदापर्यंत पोहचलो. १९९२ पासून पक्षाच्या नेत्यांनी व येथील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझ्या सारख्या कार्यकर्त्याला तीन वेळा नगरसेवक, दोनदा आमदार, आता दोनदा खासदार म्हणून संधी दिली. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी नेहमीच सहकार्य केले. तर येथील मतदारांनी आपल्याला दिलेले प्रेम आणि विश्वास टाकल्याने गेली ३२ वर्षे आपण लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. या पुरस्काराला मोठे महत्व आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देशांतील सर्व पक्षीय उकृष्ट खासदारांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी संसद रत्न पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली होती. या समितीत संसदीय कामकाज मंत्री आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश असतो. खासदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून सदर पुरस्कार दिला जातो. अश्या प्रकारच्या पुरस्काराने काम करायला बळ व प्रोत्साहन मिळते. जर तुम्ही निष्टेने व प्रामाणिक पणे जनतेची सेवा केली तर तुम्हाला निश्चित यश मिळते.

लोकसभेत केली प्रभावी कामगिरी

लोकसभेत प्रभावी कामगिरी करतांना त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आणि खाजगी विधेयके मांडून आणि त्यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, शाळेत भगवद गीतांचे पाठ सुरू करणे, मुलींची लग्नाची वय वाढवणे अश्या अनेक संवेदनशील मुद्दावर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविला. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी राहिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते पहिले खासदार आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून ३२ वर्षे दैदिप्यमान कामगिरी

खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य नगर येथील एका झोपडपट्टीतून आपले सामाजिक कार्य सुरू केले होते. त्यांनी युवक मंडळ संस्थेमार्फत स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यावेळी भाजप नेते राम नाईक आणि हेमेंद्र महेता यांच्या संपर्कात आले. सर्वात प्रथम १९९२ ला मुंबई महानगरपालिका निवडणूक लढविली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, आमदार व खासदार म्हणून विविध पदांवर गेली ३२ वर्षे लोकप्रतिनधी म्हणून दैदिप्यमान कामगिरी करत कधीच मागे वळून पाहिले नाही.  कठोर परिश्रम, नागरिकांसाठी विशेष तळमळ, आगळी वेगळी कार्य पद्धती आणि दुरंदेशी विचार या सर्व गोष्टीमुळे मुंबई महानगरपालिकेत महत्वपूर्ण पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली तसेच उपमहापौर पद ही भूषविले.

भारतीय जनता पक्षाचे संघटन बोरिवली मण्डल अध्यक्ष ते मुंबई सचिव आणि मुंबई भाजप अध्यक्षचे पदावर ही त्यांनी काम करून पक्ष संघटन मजबूत केले. तसेच श्रेष्ठ नगरसेवक पदाचा मान मिळवून गोपाळ शेट्टी तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली मतदारसंघातून आमदार म्हणून दोन टर्म त्यांनी मतदार संघात अनेक विकासकामे आणि अनेक उद्यानांची निर्मिती करून उद्यान सम्राट त्यांनी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला. पोईसर जिमखाना, कमला विहार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि वीर सावरकर उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, झांसी राणी उद्यान अश्या काही विशाल आणि उल्लेखनीय उद्यानांची निर्मिती करून त्यांनी उत्तर मुंबईच्या नागरिकांना समर्पित केले.

बोरिवली पश्चिम चिकुवाडी येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या गेल्या  १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महापालिकेची मदत न घेता खासदार निधीतून १५ एकर विस्तीर्ण जागेत कमी पैशात साकारले आहे. कांदिवली पूर्व येथील अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र संकुल भूखंडावर खा. गोपाळ शेट्टी यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी स्वप्न पाहिले होते. महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी सरकारच्या आणि प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे २०२१ डिसेंबर पासून या ऐतिहासिक कार्यात विलंब झाला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी प्रतिमा स्थापन करण्यासाठी परवानगी दिली. दि. १३ ऑगस्ट रोजी शिल्पकार उत्तम पाचरणे यांनी पुतळा १४.५ फूट उंच आणि १८०० किलोग्रम वजन तसेच ब्राँझ धातूचे बनविलेल्या भव्य पूर्णाकृती पुतळा येथे बसवला. आज आकृर्ली मेट्रो स्टेशन समोर असलेला पुतळा पश्चिम दुर्तगती महामार्गावर जाता येता सर्वांचे लक्ष वेधून घेतो. महापुरुष जयंती निमित्त अनेक व्याख्यानमाला आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकाला भाजपशी जोडून घेण्याचे श्रेय त्यांना आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी महिला आधार भवनचे निर्माण केले आणि आज मिती पर्यंत हजारो महिलांना उत्तर मुंबईत रोजगार उपलब्ध करून देण्याचा श्रेय त्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धूर मुक्त भारत योजनेत त्यांनी उत्तर मुंबई धूर मुक्त केले आणि घराघरात गॅस पहोचवून विक्रम स्थापित केले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पटेल यांनी केले.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content