Homeकल्चर +अल्झायमर आजारावरील एकांकिकेचे...

अल्झायमर आजारावरील एकांकिकेचे सांगलीत आयोजन

मेंदूमधील न्यूरॉन्स मृत होऊ लागल्याने अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश, भ्रम (Hallucinations) असे आजार होतात. अल्झायमर हा हळूहळू वाढणारा आजार असल्याने आणि खूप प्रभावी औषधे उपलब्ध नसल्याने या रुग्णांचे पुनर्वसन करणे हाच उपाय उरतो, असे  डॉ. प्रणव देशमुख म्हणाले.

केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने अल्झायमर्स आजारावर आधारित एकांकिकेच्या सांगली येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या रोगात कौटुंबिक, वैद्यकीय, मानसोपचार यासारखी मदत खूप महत्त्वाची असते. मानसिक मदतीमध्ये सामाजिक आणि भावनिक मदत महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी भार्गवी गोगटे, गायत्री लोहकरे यांनी निखिल पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अल्झायमरवर आधारित एकांकिका प्रस्तुत केली. यावेळी डॉ. आर. एम. यल्लाटी, डॉ. भगवान पाटील तसेच इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content