Homeहेल्थ इज वेल्थतीक्ष्ण चाकू हल्ल्यातील...

तीक्ष्ण चाकू हल्ल्यातील जखमीला डॉक्टरांनी वाचवले!

अतिशय तीक्ष्ण चाकू हल्ल्याने अनेक वार होवून मृत्यूच्या दाढेत गेलेल्या व्यक्तिवर तातडीची, अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया करुन त्याचे प्राण वाचवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाला यश आले आहे.

मुंबई महापालिकेच्या सांताक्रूझ (पूर्व) येथील विष्णूप्रसाद नारायण देसाई रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी अपघात विभागात एका ३६ वर्षीय रूग्णाला अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत होळीच्या दिवशी म्हणजे ७ मार्च २०२३ रोजी दाखल करण्यात आले होते. तीक्ष्ण चाकू हल्ल्यामध्ये अनेक वार झाल्याने या व्यक्तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या, तसेच त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूस बरगड्यांच्या खाली चाकूने वार करण्यात आले होते. यकृताला इजा पोहोचून पोटात मोठ्या प्रमाणावर रक्त साकळले होते. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे चाकू पोटात खोलवर अडकला होता. या जीवघेण्या हल्ल्याने रुग्णाची स्थिती अतिशय चिंताजनक झाली होती. प्रचंड रक्तस्त्रावदेखील झाला होता.

व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय चमुने अतिशय प्रसंगावधान राखून व कुशलतेने ही परिस्थिती हाताळली. सर्व वैद्यकीय पथकाला युद्धपातळीवर पाचारण केले. रूग्णाची गंभीर परिस्थिती पाहून वैद्यकीय मंडळींनी रूग्णावर तातडीने उपचार सुरू केले. तातडीची शस्त्रक्रिया करताना सर्वप्रथम रुग्णाचा रक्तस्त्राव रोखला.  यकृतामधून होणारा रक्तस्त्राव आटोक्यात आणल्यावर साकळलेले रक्त बाहेर काढले. पोटात रुतलेला चाकू बाहेर काढणे अतिशय आव्हानास्पद होते. कारण, त्यामुळे इजा वाढण्याची शक्यता होती. मात्र वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर हे आव्हान पेलून या रुग्णाचा जीव वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आले.

व्ही. एन. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंस सिंग बावा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकातील डॉ. धर्मश्री कदम, डॉ. हिमानी सैनी, डॉ. सात्विक भालेराव, भूलतज्ञ डॉ. सलाउद्दिन के. पी., डॉ. अक्षता सूथकट्टी या चमूने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पाडून रुग्णाचा जीव वाचवला, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

अथक वैद्यकीय प्रयत्नांती हा रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. अतिदक्षता विभागामध्ये प्रारंभी वैद्यकीय देखरेख करुन रूग्णाची परिस्थिती स्थिर होण्यासाठी मदत झाली. त्यानंतर सुमारे आठवडाभर उपचार झाल्यानंतर रूग्णाला घरी सोडण्यात आले. वैद्यकीय चमुने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे, वेळीच केलेली शस्त्रक्रिया तसेच वैद्यकीय कौशल्यामुळे या रूग्णाचा जीव वाचणे शक्य झाले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content