Homeमुंबई स्पेशलएनटीसीच्या चाळींमधील 2062...

एनटीसीच्या चाळींमधील 2062 रहिवाशांचं होणार पुनर्वसन!

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) गिरण्यांच्या जमिनीवरील 11 मोडकळीस आलेल्या चाळींचा कालबद्ध पद्धतीने विकास केला जाईल आणि तेथील सुमारे 2062 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल दिली.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत, चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि MoT अंतर्गत CPSE, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या हस्तांतरणीय विकास हक्क (TDR)च्या विक्रीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

एनटीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा यांनी एनटीसीच्या गिरण्यांची अवस्था आणि गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या गंभीर समस्येबाबत, एनटीसीनं महाराष्ट्र सरकार, म्हाडा आणि एमएमआरडीए यांच्या सहकार्यानं केलेले प्रयत्न विशद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामासाठी, महाराष्ट्र शासनाला करण्यात आलेल्या इंदू मिल क्रमांक 6च्या जमिनीच्या हस्तांतरणाच्या बदल्यात, एनटीसीला सुपूर्द केलेल्या टीडीआरच्या मुद्रीकरणासंबंधीच्या घडामोडींचाही यात समावेश होता.

NTCची स्थापना 1968मध्ये, 1974, 1985 आणि 1995च्या राष्ट्रीयीकरण कायद्याद्वारे, आजारी कापड गिरण्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी झाली होती. सध्या NTCकडे सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांसह, 23 कार्यरत गिरण्या, 49 बंद गिरण्या (आयडी कायद्यांतर्गत), 16 जे व्ही गिरण्या आणि 2 बंद गिरण्या आहेत. मुंबईत 13.84 एकर क्षेत्रफळ व्यापलेल्या, एनटीसी गिरण्यांच्या 11 चाळी, मोडकळीस आल्या आहेत. मुंबईतील कापड गिरण्यांच्या चाळींच्या इमारतीचा पुनर्विकास, DCPR 2034 तरतुदींनुसार जमीन मालक NTCसाठी अनिवार्य आहे.

या चाळींमधील रहिवाशांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आणि विकास नियमन आणि प्रोत्साहन नियमन (डीसीपीआर) तरतुदींचे पालन करण्यासाठी, एनटीसीने संभाव्य विकास संकल्पना, कार्यपद्धतीची आखणी, विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा कागदपत्रे तयार करणे आणि एनटीसी चाळींच्या पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी एक सल्लागार नेमला  आहे.

एनटीसी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या पॅनेलवरील वास्तुविशारदांशी सल्लामसलत करून योग्य पद्धत विकसित करण्याचे काम सल्लागाराने सुरू केले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला बिगर उपकरप्राप्त 5 चाळींचे उपकरप्राप्त चाळींमध्ये रूपांतर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन म्हाडाद्वारे या चाळींची वेळेवर देखभाल केली जाईल. चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकार, म्हाडा आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना पुनर्विकास आणि पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचे तसेच यासाठी एनटीसीला आवश्यक ते सर्व सहाय्य प्रदान करण्याचे निर्देश दिले.

एनटीसीच्या टीडीआर विक्रीच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. एनटीसीने 25.03.2017 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सरकारकडे इंदू मिल क्र. 6 (डाय वर्क्स)ची 11.96 एकर जमीन हस्तांतरित केली होती. त्या हस्तांतरणाच्या बदल्यात, महाराष्ट्र सरकारने 1413.48 कोटी रुपये किंमतीचे विकास अधिकार हस्तांतरण म्हणून विकास हक्क प्रमाणपत्र जारी केले. एनटीसीला उपरोक्त जमिनीच्या मूल्याव्यतिरिक्त टीडीआर विकून मिळालेले पैसे महाराष्‍ट्र सरकारला स्‍मारक बांधण्‍यासाठी दिले जातील आणि मिळालेले पैसे कमी असल्‍यास, महाराष्ट्र सरकार एनटीसीला उर्वरित रक्कम प्रदान करेल.

बाजारपेठ संशोधन, निविदा दस्तावेज तयार करणे, संभाव्य खरेदीदारांना शोधणे, बाजारातील कलबाबत एनटीसीला अवगत करणे, विक्रीसाठी टीडीआरचे प्रमाण, महसूल वाढवणे, अन्य पद्धतीसह एनटीसीच्या टीडीआर विक्रीसाठी व्यवहार सल्लागार सेवा पुरवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना एनटीसीबरोबर समन्वयाने काम करण्याचे आणि एनटीसीला टीडीआरच्या मुद्रीकरण प्रक्रियेत मदत करण्याचे निर्देश दिले.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content